बुलढाण्यात उकळी येथे विद्यार्थ्यांनी साकारली डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा

651

बुलढाण्यात महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून जगदंबा विद्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने उकळी येथील प्रसिद्ध कलाकार व रांगोळीकार कृष्णा सासवडकर यांच्या संकल्पनेतून 701 विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे बसवले होते की, त्यातून बाबासाहेबांची प्रतिकृती साकारली होती. या कार्यक्रमासाठी उकळी गावचे सरपंच रामेश्वर बोरे, सुकळी गावचे सरपंच नितीन नवले तसेच जिल्हा परिषद शाळा उकळी मुख्याध्यापक नाजूकराव देशमुख व तसेच जगदंबा विद्यालयाचे संस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, मुख्याध्यापक मनीष काळे तथा दोन्ही शाळेचे शिक्षक, सद्दाम शहा यांनी मोलाचे सहकार्य केले.

आपली प्रतिक्रिया द्या