ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकला विजेची तार चिकटली, चालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकला मुसळेवाडी शिवारात विजेची तार चिकटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.18 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान घडली असून रेणापूर पोलिसात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेणा सहकारी साखर कारखाण्याची ऊस वाहतूक करणारी ट्रक क्र.(M. H.40Y 1336) ही ट्रक रेणासाखर कारखान्यावर ऊस खाली करून ऊस भरण्यासाठी मुसळेवाडीकडे येत असताना पट्टी वडगाव -मुसळेवाडी रस्त्यावर मुसळेवाडी शिवारात सदरील ट्रकला मुख्य विद्युत वाहिनीची तार चिकटल्याने शॉक लागला. त्यामुळे ट्रक चालक दत्ता वामन शिंदे (वय 40वर्ष रा. कांबळगा ता. शिरूर अंनतपाळ) यांचा जागीच मृत्यू झाल्याची खबर सूर्यकांत लक्ष्मण कातळे यांनी रेणापूर पोलीस स्टेशन मध्ये दिल्यावरून आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस जमादार नामदेव सारूळे करत आहेत.