
हिंदुस्थानी संघाचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल आता आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधूनही बाहेर आहे. अशा परिस्थितीत तो लवकर बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. आता केएल राहुलचे सासरे म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी यांनीही त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि तो लवकरच बरा होऊन पुन्हा दमदार पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
केएल राहुलला ज्यावेळी दुखापत झाली त्यावेळी अथिया शेट्टी स्टेडिअममध्ये उपस्थित होती. नवऱ्याला दुखापत झाल्याचे पाहून ती प्रचंड घाबरली होती. आता केअल राहुलचे सासरे अभिनेता सुनील शेट्टी यांनी जावयाच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, तो फायटर आहे आणि लवकरच बरा होऊन परतेल. राहुलने आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. खरंतर बरेच सारे खेळाडू जखमी होत असतात. ज्यामध्ये बुमराह, अय्यर आणि आता केअल राहुलचे नाव सहभागी झाले आहे. तो लवकर बरा होऊ न दमदारपणे परतेल असे सुनील शेट्टीने सांगितले. पुढे तो म्हणाला की, सोमवारी केएल राहुलवर शस्त्रक्रिया होणार आहे. चाहते तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. हिंदुस्थानी क्रिकेट संघात एकापेक्षा एक चांगले खेळाडू आहेत. सर्व चांगले खेळतात. मला वाटत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याची संधी यावेळी अन्य कोणाला तरी मिळेल.
View this post on Instagram
आयपीएल सामन्यादरम्यान केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती. स्वत: केएल राहुलने ही पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. तो आता आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही तो बाहेर पडला आहे. 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना खेळताना क्षेत्ररक्षणादरम्यान राहुलला दुखापत झाली होती. तो संपूर्ण सामन्यात बसून होता आणि शेवटचा फलंदाज म्हणून फलंदाजीसाठी आला होता. मात्र, 10 मिनिटे खेळपट्टीवर राहूनही तो एकही धाव करू शकला नाही आणि संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.


























































