
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोरोना संदर्भातल्या आवाहानाला सर्वांनी सहकार्य करा. आपलं गाव, आपले ,शहर ,आपला देश यातून मुक्त करायचा असेल तर हे कुणा एकट्याचे व प्रशासनाचे काम नसून सर्वांचा लढा आहे, असे वक्तव्य हभप इंदुरीकर महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
इंदुरीकर महाराज यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात 63 जणांना कोरोना सारख्या आजाराने बाधित केलेले आहे. त्यामुळे आपले गाव, आपले शहर, आपला देश मुक्त यातून करायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे व ती गरजेचे आहे. हा कोण्या एकट्या दुकट्या व निव्वळ शासन, प्रशासनाचे नाही तर सर्वांचा लढा आहे तेव्हा सर्वांनी खबरदारी घ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. प्रत्येकाने आपण आपले कुटुंब कोरोना विषाणूपासून दूर ठेवा. घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या व शासनाला सहकार्य करा. मी पण घरी आहे तुम्ही पण बाहेर पडू नका, असे इंदुरकर महाराज यांनी म्हटले आहे. इंदुरकर महाराज यांनी दिनांक 31 मार्चपर्यंत सर्व कीर्तनाचे कार्यक्रम रद्द केलेले आहे.


























































