टीम इंडियाच्या जर्सीसाठी त्याने अजून काय करावंं? माजी खेळाडूचा संतप्त सवाल; विरुचीही मिळाली साथ

देशांतर्गत क्रिकेट आणि आता यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुमार यादव सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र तरीही आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची वर्णी लागली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते आणि क्रीडा प्रेमी बीसीसीआय आणि निवड समितीला फैलावर घेत आहेत.

चाहत्यांसह टीम इंडियाचे माजी खेळाडूही सूर्यकुमारची पाठराखण करत आहे. के. श्रीकांत यांनी निवड समितीवर निशाला साधला असून त्याला टीम इंडियाच्या जर्सीसाठी आणखी काय करावं लागेल? असा संतप्त सवालही विचारला आहे. तसेच टीम इंडियाचा माजी विस्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग यानेही ‘बंदे मे दम है’ म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे.

दमदार प्रदर्शन

बुधवारी सूर्यकुमार यादव याने बंगळुरू विरुद्ध मॅच विनिंग खेळी करत आपला ‘गेम’ विराट आणि निवड समितीला दाखवून दिलं. सूर्यकुमारने 43 चेंडूत नाबाद 79 धावा फटकावत मुंबईला विजय आणि प्ले ऑफचे तिकीट मिळवून दिले. या खेळीनंतर माजी खेळाडू के. श्रीकांत यांनी ट्विट करून निवड समितीला सवाल केला.

IPL 2020 – सूर्य तळपला, थेट विराटला भिडला; दोघांमधील ‘टशन’ कॅमेऱ्यात कैद

श्रीकांत यांचा बोचरा सवाल

‘सूर्यकुमारची जबरदस्त खेळी. टीम इंडियाचा जर्सी मिळवण्यासाठी त्याला आणखी काय करावं लागेल माहीत नाही. पण त्याची खेळी पाहाताना मजा आली. आशा आहे की लवकरच तो टीम इंडियाचा जर्सी घालून अशी खेळी करताना पाहायला मिळेल’, असे ट्विट के. श्रीकांत यांनी केले.

‘बंदे में दम है’

के. श्रीकांत यांच्यासह विरुने देखील मुंबई-बंगळुरू सामना संपल्यावर ट्विट केले. ‘बंदे मै दम हैं. लवकरच नंबर लागेल. सलग 3 ब्लॉकबस्टर हंगाम. सूर्यकुमारची अफलातून खेळी आणि मुंबईचा शानदार विजय’, असे ट्विट विरुने केले.

सलग तिसऱ्यांदा 350+

दरम्यान, सूर्यकुमारने सलग तिसऱ्या आयपीएल सिझनमध्ये 350 हुन अधिक धावा केल्या आहेत. याआधी 2019 ला त्याने 424 धावा फटकावल्या होत्या, तर 2018 ला 512 धावा केल्या होत्या.

… तर अर्ध्या सिझनपर्यंत ‘टॉप’वर असणारा दिल्लीचा संघ IPL मधून बाहेर होणार, असं आहे गणित

आपली प्रतिक्रिया द्या