स्वारगेट परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक, युनिट दोनची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वारगेट बसस्थानकाजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखा दोनने अटक केली. त्यांच्याकडून मिरची पावडर, कोयता, मोबाइल असा 31 हजारांचा ऐवज जप्त केला.

संतोष शरणप्पा जाधव (38), अमित नाना चव्हाण (27), विनोद बजरंग गायकवाड वय (34, सर्व रा. मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सचिन अशोक गायकवाड, विकी कृष्णा मानेक अशी फरार झालेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांनी तक्रार दिली आहे.

गुन्हे शाखेचे पथक दोन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी स्वारगेट पुलानजीक एक टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिरची पावडर, कोयता, मोबाइल असा 31 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, एपीआय वैशाली भोसले, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, गजानन सोनुने, उज्ज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, मोहसीन शेख, प्रमोद कोकणे, साधना ताम्हाणे, उत्तम तारू, नागनाथ राख यांनी केली.