
टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची आज बीसीसीआयने घोषणा केली. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत आज मुंबईत बैठक झाली या बैठकीत टीम इंडियाचा वर्ल्डकपचा संघ निवडण्यात आला. येत्या 17 ऑक्टोबरपासून दुबईमध्ये हा वर्ल्डकप सुरू होणार आहे.
TEAM – Virat Kohli (Capt), Rohit Sharma (vc), KL Rahul, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Rahul Chahar, Ravichandran Ashwin, Axar Patel, Varun Chakravarthy, Jasprit Bumrah, Bhuvneshwar Kumar, Mohd Shami.#TeamIndia
— BCCI (@BCCI) September 8, 2021
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांना पहिल्या 15 मध्ये स्थान देण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व दीपक चहर यांना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.
Standby players – Shreyas Iyer, Shardul Thakur, Deepak Chahar.#TeamIndia
— BCCI (@BCCI) September 8, 2021

























































