निजामाच्या औलादीचा बंदोबस्त करा ; शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर 

जमावबंदी आदेश लागू असताना एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर पाच-सहा हजार लोकांचा जमाव जमवून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण केली. पोलिसांनी एक तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून निजामाच्या या औलादीचा बंदोबस्त करावा, पोलिसांना ते शक्य नसल्यास तसे शिवसेनेला लेखी कळवावे, या धर्मांधांचा बंदोबस्त आणि हिंदूंचे संरक्षण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू, असा इशारा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात नमूद आहे की, एमआयएमने काही दिवसांपूर्वी संभाजीनगर शहरात दंगल घडविली होती. या दंगलीतील काही जणांना पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने अटक केली होती. या लोकांना अटक करण्यात येऊ नये म्हणून आमदार इम्तियाज जलील यांनी जमावबंदी आदेश असताना सिटी चौक पोलीस ठाण्यावर पाच-सहा हजार मुस्लिमांचा अघोषित मोर्चाच आणला. तेथे त्यांनी धरणे दिले. एवढेच नव्हे तर जे इम्तियाज जलील कालपर्यंत शहरात शांतता राखण्यासाठी मला पत्र लिहून आपण शांतता मोर्चा काढू, असे म्हणत होते त्यांनीच सिटी चौक पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करीत दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण केली.

खैरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, ही घटना घडत असताना सिटी चौक बाजारपेठेतील हिंदूंची दुकाने बळजबरीने बंद केली जात होती. हिंदू व्यापारी फोनवरून प्रत्यक्ष भेटून बाजारपेठेत दहशत माजवली जात असल्याच्या तक्रारी करीत होते. आपण पोलीस उपायुक्त ढाकणे यांना दुकाने उघडण्यासाठी तात्काळ बंदोबस्त द्या, बाजारपेठेतील एमआयएमप्रणीत मुस्लिमांची दहशत थांबवा, अशा सूचना फोनवरून देत होतो. मात्र, पोलिसांनी या काळात काहीही पावले उचलली नाहीत.

खासदार खैरे यांनी आपल्या निवेदनातून सवाल उपस्थित केला की, हे धरणे सुरू असताना मुस्लिम लोक अल्लाहू अकबरच्या घोषणा देत होते, काही मुस्लीम महिला पोलीस ठाण्यात बांगड्या पेâकत होत्या. इम्तियाज जलील हे पोलीस पेâरीवाल्यांकडून पैसे खातात, हप्ते घेतात, असे बिनबुडाचे, बिनपुराव्याचे आरोप करीत होते तर पोलीस आयुक्तासारखा अधिकारी मात्र याच पोलीस ठाण्यात मागच्या दाराने लपून-छपून आत जातात. हीच महाराष्ट्राच्या गृहखात्याची मर्दानगी आहे काय? चार तास घोषणाबाजी करणाऱ्या व दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या आमदार इम्तियाज जलील यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत काय? पोलीस तथा महाराष्ट्राचे गृहखाते हे काम करु शकत नसेल तर आम्हाला लेखी द्या. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यावर हिंदूंचे रक्षण करण्याचे संस्कारच केलेले आहेत. आम्ही यापूर्वीही हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो होतो. आम्हाला ते नवीन नाही. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्यासाठी आपले गृहखातेच जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी या निवेदनात दिला आहे.