ऑनलाइन वीज बिल भरताना सावधान, तुमच्या पैशांवर भलताच डल्ला मारू शकतो

1337

ऑनलाइन वीज बिल भरणार्‍या महावितरणच्या बड्या उच्चदाब ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऑनलाइन वीज बिल भरताना खबरदारी घ्या किंवा आरटीजीएसने बिलाची रक्कम भरा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणच्या पुणे येथील एका उच्चदाब वीज ग्राहकाला बनावट ई-मेलद्वारे भलताच बँक खाते क्रमांक पाठवून लाखो रुपयांच्या वीज बिलाची रक्कम हडपली आहे. सदर बाब महावितरणच्या निदर्शनास येताच प्राशासन खडबडून जागे झाले आहे. बनावट ई-मेलद्वारे दुसरे खाते क्रमांक पाठवून अन्य वीज ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना ऑनलाइन वीज बिल भरताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

ही खबरदारी घ्या!

महावितरणचे वीज बिल भरण्यासाठी एस बँक आणि एसबीआय बँक खाते क्रमांक बिलावर दिलेला असतो. एस बँकेचा खाते क्रमांक एमएसईडीसीएल या आक्षराने सुरू होतो, तर एसबीआय बँकेचा एमएसईडीएचटीने सुरू होत असून त्यांचा लाभार्थी महावितरण आहे. या सर्व बाबींची ग्राहकांनी खातरजमा करूनच ग्राहकांनी वीज बिल भरावे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या