चंद्रावर नेणार, हेलिकॉप्टर अन् रोबोट देणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उमेदवारांनी आश्वासनांचा पाऊस पाडायला सुरुवात केलेली आहे. अशातच एका अपक्ष आमदाराच्या जाहीरनाम्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. उमेदवाराने मतदारांना चक्क चंद्रावर सहलीला नेण्याचे, एक कोटी देण्याचे तसेच आयपह्न, हेलिकॉप्टर, कार, रोबोट देण्याचे आश्वासन दिले आहे. दक्षिण मदुराई मतदारसंघातून निवडणूक  लढवणाऱया सरावनान यांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनांची चर्चा रंगलेय. मतदारसंघात अंतराळ संशोधन केंद्र, रॉकेट लाँचिंग साइट आणि 300 फुटांचा कृत्रिम हिमनग उभारण्यात येईल, अशी घोषणाही केली आहे.