विद्यार्थ्यांची टोल कर्मचाऱ्यांशी झटापट, वाहतूक ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
toll-plaza

तमिळनाडूमधील विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पेमेंटच्या कारणास्तव रविवारी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील टोल प्लाझावर थांबवण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. विद्यार्थ्यांनी तेथे दगडफेक केली आणि तेथे उपस्थित असलेल्या काही वाहनांचेही नुकसान केले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतरही काही काळ चकमक सुरूच होती.

परीक्षा संपवून विद्यार्थी परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हा विद्यार्थ्याचे वाहन टोलनाक्यावर थांबवण्यात आले. कारण त्याचे फास्टॅग पेमेंट काम करत नव्हते. त्यानंतर विद्यार्थ्याला त्याची कार मागे घेण्यास सांगितले आणि त्याच्या मागे रांगेत असलेल्या इतर वाहनांचा मार्ग मोकळा करण्यास सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थ्यांना इतर वाहनांना अडथळा करू नये, असे सांगितले. परंतु विद्यार्थी ठाम राहिले आणि कथितरित्या तामिळनाडू नोंदणी असलेल्या वाहनांनाच रस्ता दिला आणि आंध्र प्रदेशातील वाहनांना जाण्यापासून रोखले. यावरून विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून, यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे सांगितले आहे.