तारक मेहताच्या सोढीचे काय झाले? सीसीटीव्ही फुटेजमुळे सस्पेन्स वाढला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही मालिकेत रोशनसिंग सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी कलम 365 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे, त्यावरून हे अपहरणाचे प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे.

गुरुचरण काही कामानिमित्त मुंबईला जाणार होता. त्याबद्दल त्याने मुंबईतील मित्रांनाही कळवले होते. त्याची भक्ती सोनी नावाची मैत्रीण त्याला घ्यायला विमानतळावर पोहोचली होती, पण गुरुचरण पोहोचलाच नाही. पोलिसांनी मुलाला शोधण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती गुरुचरण सिंगचे वडील हरगीत सिंग यांनी दिली आहे. मला आशा आहे की, तो जिथे असेल तिथे सुखरूप असेल आणि पोलीस त्याला लवकरच शोधून काढतील, असे ते म्हणाले. 50 वर्षीय गुरुचरण सिंग पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्या वडिलांनी दिल्लीतील पालम पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. सुरुवातीच्या तपासानुसार गुरुचरण 22 एप्रिलला सकाळी मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला. त्याचे साडेआठ वाजता फ्लाईट होते, पण तो विमानात बसलाच नाही. 25 एप्रिलला दुपारी त्याच्या वडिलांनी पालम पोलिसांत तक्रार दिली होती.

आर्थिक व्यवहाराच्या तपशिलामुळे संभ्रम

तपासात आता पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे, ज्यात गुरुचरण जाताना दिसतोय. 24 एप्रिलपर्यंत त्याचा फोन सुरू होता, पण आता तो बंद येत आहे. पोलिसांनी त्याच्या फोनच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील तपासले असून त्यात विचित्र गोष्टी आढळल्या आहेत. त्याने अनेक आर्थिक व्यवहार केल्याचेही दिसून आले आहे. हे आर्थिक व्यवहार संशयास्पद वाटत आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून गुरुचरणचा शोध घेतला जात आहे.

एक फोन स्किच ऑफ, दुसऱयाकर रिंग जात होती

सोढी यांच्याकडे दोन मोबाइल नंबर आहेत. यातील एक फोन स्किच ऑफ येत होता,  तर दुसऱया फोन नंबरकर रिंग जात होती. परंतु, फोन उचलला गेला नाही. मी खूप काट पाहिली. पण सोढीने फोन उचलला नाही, असे सोढीच्या  फॅमिली प्रेंडने सांगितले. या दोन्ही नंबरकर मी दोन दिकस लागोपाठ कॉलिंग केले. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.