
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील ज्ञानस्रोत केंद्रासाठी (राजाबाई टॉवर ग्रंथालय) मुंबई विद्यापीठाला 75 लाखांची देणगी दिली आहे. या देणगीतून ग्रंथालयातील अमूल्य ग्रंथसंपदेचे जतन आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातील विविध उपकरणे घेण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर दमानी फॅमिली फाऊंडेशनने विद्यानगरी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांकरिता आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाला अनुसरून आवश्यक प्रकल्पाचे स्वखर्चाने बांधकाम करून देण्याच्या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र सरकारच्या वतीने संशोधनासाठी मुंबई विद्यापीठाला 50 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे.






























































