प्रॉडक्टच्या नावाखाली शिक्षिकेची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध मार्केट प्रॉडक्टच्या विक्रीत परताव्याच्या नावाखाली शिक्षिकेची 2 लाख 86 हजार रुपयाची फसवणूक झाली आहे. फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत.

तक्रारदार या शिक्षिका असून त्या बोरिवली येथे राहतात. गेल्या आठवडयात तक्रारदार याना मोबाईलवर एक मेसेज आला. त्या मेसेज मध्ये नोकरीबाबत माहिती सह एक लिंक होती. त्यामुळे तक्रारदार याने ती लिंक क्लिक केली. लिंक क्लिक केल्यानंतर तक्रारदार याना नोकरीबाबत काही चॅट्स आले. तसेच त्यांना आणखी एक लिंक पाठवण्यात आली. त्या लिंक मध्ये नोकरी नोंदणी आणि काम कसे करायचे याची माहिती होती. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार याने त्या लिंकवर माहिती अपलोड करून नाव नोंदणी केली. नाव नोंदणी केल्यावर तक्रारदार याना विविध प्रॉडक्ट खरेदी करण्यास भाग पाडले. सुरुवातीला तक्रारदार याना चांगला परतावा देण्यात आला. त्यानंतर तक्रारदार याने 2 लाख 86 हजार रुप्याचे विविध प्रॉडक्ट खरेदी केले. खरेदी केलेल्या प्रॉडक्टचे पैसे ऑनलाईन वॉलेटवरून भरले. वस्तू खरेदी केल्यावर तक्रारदार यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.