शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या मानधनात वाढ

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी झाला असून ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली आहे.

शाळांमध्ये साजरा होणार आजी-आजोबा दिवस

आजी-आजोबांमुळे मुलांवर चांगले संस्कार होतात. त्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीही महत्त्वाची आहे. हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी येत्या 10 सप्टेंबर 2023 रोजी राज्यात आजी आजोबा दिवस साजरा केला जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आजी-आजोबांना या दिवशी शाळेमध्ये बोलवण्यात येईल. विद्यार्थ्यांना आपल्या आजी-आजोबांचा परिचय सर्वांना करून द्यावा लागेल. त्यानंतर आपली नातवंडे कुठे शिकतात, कोणत्या वर्गात शिकतात ते आजी-आजोबांना दाखवण्यात येईल. त्यांच्या मनोरंजनासाठी संगीतखुर्ची आदी खेळ ठेवले जातील, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतील. या कार्यक्रमांमध्ये शाळेतील शिक्षकही भाग घेतील. आजीच्या बटव्याचे महत्त्व यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले जाईल. आजी-आजोबांच्या हस्ते वृक्षारोपणही केले जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.

शिक्षकांचे सुधारित मानधन

– प्राथमिक व उच्च प्राथमिक – 16 हजार
– माध्यमिक – 18 हजार रुपये
– उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय – 20 हजार रुपये

शिक्षकेतर कर्मचाऱयांचे सुधारित मानधन

– पूर्णवेळ ग्रंथपाल – 14 हजार रुपये
– प्रयोगशाळा सहाय्यक – 12 हजार रुपये
– कनिष्ठ लिपिक – 10 हजार रुपये
– चतुर्थश्रेणी कर्मचारी (अनुकंपा) – 8 हजार रुपये