
अमेरिकेतील टेक्सास भागात उवाल्डेतील एका शाळेत माथेफिरू तरुणाने अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात 21 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 19 लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात 2 शिक्षकही मृत्यूमुखी पडले असून त्यात इर्मा गार्सिया यांचा समावेश आहे. पत्नीच्या निधनामुळे धक्का बसलेल्या त्यांच्या पतीचे म्हणजेच जो गार्सिया यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या दोघांच्या पश्चात दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे.
EXTREMELY heartbreaking and come with deep sorrow to say that my Tia Irma’s husband Joe Garcia has passed away due to grief, i truly am at a loss for words for how we are all feeling, PLEASE PRAY FOR OUR FAMILY, God have mercy on us, this isn’t easy pic.twitter.com/GlUSOutRVV
— john martinez ❤️🔥 (@fuhknjo) May 26, 2022
इर्मा यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी एक निधी गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. य़ा कुटुंबासाठी 10 हजार डॉलर्स (7 लाख 76 हजार रुपये) गोळा करण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात या मोहिमेअंतर्गत गुरुवारपर्यंत 16 लाख डॉलर्स (12 कोटी 42 लाख) जमा झाले आहेत.
माथेफिरू तरुणाने प्राथमिक शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला. यात 19 चिमुकल्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. यात दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गात शिकणाऱया विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी मारेकऱ्याला गोळय़ा घातल्या असून, या घटनेमुळे अमेरिकेत प्रचंड दहशत पसरली आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया देत देशात चार दिवसांचा दुखवटा जाहीर केला.
25 मे 2022 रोजी म्हणजेच मंगळवारी टेक्सास प्रांतातील उवाल्डे या छोटय़ाशा शहरातही माणूसकीला हादरवून सोडणारी घटना घडली होती. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी दिलेल्या माहितीनुसार रॉब प्राथमिक विद्यालयात सल्वाडोर रामोस (18) हा तरुण घुसला. शाळेत घुसताच त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. वर्गात घुसून त्याने चिमुकल्यांवर गोळय़ांचा वर्षाव केला. गोळीबार होताच एकच हलकल्लोळ उडाला. यात 19 चिमुकल्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. एका महिलेसह 10 वर्षांच्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. रामोस हा शाळेकडे येण्यापूर्वी त्याने घरी आपल्या आजीलाही गोळय़ा घातल्या. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी शाळेकडे धाव घेतली. संपूर्ण शाळेला घेराव घालण्यात आला. सल्वाडोर रामोस याने पोलीस आल्यानंतरही गोळीबार चालूच ठेवला होता. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात रामोस ठार झाला.
राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रॉब प्राथमिक शाळेत घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. गोळीबारात मरण पावलेल्या चिमुकल्यांच्या तसेच शिक्षकांच्या सन्मानार्थ देशात चार दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे बायडेन यांनी जाहीर केले. या कालावधीत सर्व अमेरिकी कार्यालये, परदेशातील अमेरिकी दूतावास, लष्करी मुख्यालय, नौदल, वायुदलाच्या कार्यालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर झुकवण्यात येणार आहे.






























































