ठाण्यात ५० वर्षे जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला; धोकादायक ‘सुयोग’मधील २५ रहिवाशांना रातोरात हलवले, सुरक्षित स्थळी स्थलांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल ५० वर्षे जुन्या असलेल्या वागळे इस्टेटमधील सुयोग निवास या दुमजली इमारतीच्या गॅलरीचा अख्खा सज्जाच कोसळला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या इमारतीतील २५ कुटुंबांची सुखरूप सुटका केली. ही इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली असून सर्व कुटुंबांचे रातोरात सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

किसननगर-३ येथे शिवमंदिर गल्लीत सुयोग निवास ही इमारत आहे. तळमजला अधिक दोन मजले असलेली ही इमारत ५० वर्षे जुनी आहे. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील अख्खा सज्जाच कोसळला. याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम, वागळे प्रभाग समितीचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि श्रीनगर पोलीस तसेच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

नातेवाईकांकडे आसरा

सुयोग निवास ही इमारत महापालिकेच्या धोकादायक यादीत आहे. त्यामुळे ही इमारत रात्रीच पूर्णपणे रिकामी करण्यात आली. रहिवाशांनी रात्रीच त्यांच्या नातेवाईकांच्या घरचा आसरा घेतला. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर त्यांना घरे सोडावी लागल्याने पुढे कसे होणार याची चिंता त्यांना लागली आहे.

त्यांनी सर्वप्रथम इमारतीचा वीजपुरवठा खंडित करून गॅलरीचा लटकणारा धोकादायक भाग काढून परिसर सुरक्षित केला व इमारतीतील २५ कुटुंबांना सुखरूपपणे बाहेर काढले.