रत्नागिरी – बनावट दागिने विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोन्याचे दागिने असल्याचे सांगून बनावट दागिने विकून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून 1 लाख 10 हजार 555 रुपये किमतीचे बनावट दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या 5 संशयितांमध्ये गंगाराम हरिलाल बघेल (रा. मध्यप्रदेश), लक्ष्मणभाई लालजीभाई वाघेला (रा. गुजरात), हिराभाई बाबूभाई वाघरी (रा. गुजरात), गीताबेन लक्ष्मण वाघेला (रा. गुजरात) आणि शांती उमेश चव्हाण (रा. गुजरात) यांचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयीत महिला कमी किंमतीत सोन्याचे दागिने घेणार का अशी विचारणा शहरातील महिलांजवळ करत होत्या. मात्र कमी किंमतीत दागिने का देत आहेत असा संशय वेदा प्रभुदेसाई यांना आला. त्यांनी ही माहिती रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याला दिली. त्या माहितीच्या आधारे रत्नागिरी शहर पोलीसांकडून मारुतीमंदिर परिसरात सापळा रचून बनावट दागिने विकणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरिक्षक शिरीष सासणे आणि त्यांच्या पथकाने केली