
ठाण्यानंतर नांदेडमधील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी आता उच्च न्यायालयात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी उद्या तातडीची सुनावणी होणार आहे. न्यायालयानं स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली आहे.
गेल्या दोन दिवसांत राज्यातील शासकीय रुग्णालयात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. बुधवारी न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलं असून महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना राज्य सरकारची भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


























































