4 डिसेंबरला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 4 डिसेंबर रोजी आहे. हे सूर्यग्रहण हिंदुस्थानातून दिसणार नाही. फक्त  ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्या दक्षिण क्षेत्रातच दिसेल. अलीकडेच वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण झाले होते. त्यानंतर आता मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण खग्रास स्वरूपातील आहे. हिंदुस्थानात त्याचा कोणताही प्रभाव पडणार नाही. 4 डिसेंबर रोजी सकाळी 10.59 वाजता सूर्यग्रहण सुरू होईल आणि दुपारी 3. 07 वाजता समाप्त होईल. ग्रहण नाम्बिया, प्रशांत, अटलांटिक, हिंद महासागर आणि अंटार्टिका क्षेत्रातच दिसू शकेल. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण भाग म्हणजे वैनबरा, मेलबर्न, व्हिक्टोरिया आदी शहरांत त्याला खंडग्रास रूपात बघता येईल.