जगभरातील खाद्य संस्कृतीचा आनंद घ्या! कफपरेडमध्ये ‘द अपर क्रस्ट फूड शो’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमाम फूडी लोक ज्याची आतुरतेने वाट पाहतात, तो ‘द अपर क्रस्ट फूड अँड वाईन शो’ आजपासून कफपरेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सुरू झाला आहे. 2 ते 4 डिसेंबर दरम्यान रंगणाऱ्या या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन  अभिनेते बोमन इराणी यांच्या उपस्थितीत झाले.

फरझाना अख्तर यांनी ‘फूड अँड वाईन शो’चे आयोजन केले  आहे. यामध्ये वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ, चॉकलेट्स, मांस, विदेशी फळे, बार आणि किचनची उपकरणे तसेच कुकरी प्रात्यक्षिके यांचा आनंद घेता येईल. सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत शोमध्ये सहभागी होता येईल.

2003 साली मुंबईत ‘अपर क्रस्ट फूड शो’ला सुरुवात झाली.   परदेशातील खाद्यपदार्थांची चव चाखता यावी म्हणून जगभरातील खाद्यपदार्थ आणि त्यांना लागणारी सामुग्री मुंबईत एका छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा फूड शो सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून मागील 15 वर्षे शोचे यशस्वी आयोजन होत आहे.

केवळ ग्राहक किंवा खवय्ये नव्हे, फूड अँड बिव्हरेज इंड्रस्टीशी संबंधित शेफ, एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर, रेस्टॉरंट मालक, विदेशातील मंडळी शोमध्ये सहभागी होतात. अनेक उत्पादनांचे आणि ब्रँडचे लाँचिगही होते.