शक्तीविना शांतता नाही, मोदी यांची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता राहिला आहे. युद्ध हा कधीच हिंदुस्थानसाठी पहिला पर्याय नाही. आम्ही नेहमीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सामर्थ्य, शक्तीशिवाय शांतता नाही, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मांडली.

पंतप्रधान मोदी यांनी कारगील येथे जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यानंतर त्यांनी जवानांना संबोधित केले.

पंतप्रधान काय म्हणाले…

– हिंदुस्थानसाठी युद्ध हा कधीच पहिला पर्याय नाही. आपल्या वीरतेमुळे, संस्कारांमुळे आपण युद्धाला नेहमीच शेवटचा पर्याय दिला आहे.
– हिंदुस्थानकडे जर कोणी वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या तिन्ही दलांचे जवान सडेतोड उत्तर देण्यास समर्थ आहेत. शत्रूला जशास तसे उत्तर देण्याचे सामर्थ्य आपल्या जवानांमध्ये आहे.
– देशाबाहेरील आणि देशांतर्गत शत्रूंशी लढा द्यावा लागत आहे. दहशतवाद, नक्षलवाद मुळापासून उखडून टाकला जात आहे.