सप्टेंबरमध्ये धुवाधार! सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार, हवामान खात्याचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑगस्टमध्ये हातचे राखून बरसणारा मान्सून सप्टेंबरमध्ये मात्र मनसोक्त बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. चालू महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा 24 टक्के कमी पाऊस झाला होता. जून महिन्यातही सात टक्के कमी पावसाची नोंद झाली होती. जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा दगा दिला. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 24 टक्के कमी पाऊस झाला. पण सप्टेंबरमध्ये पुन्हा पाऊस भरभरून दान देणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मान्सूनची अक्षीय रेखा सध्या दक्षिणेकडे आहे. 3 सप्टेंबरनंतर मान्सूनचा उत्तरेकडचा प्रवास पुन्हा एकदा सुरू होईल. त्यामुळे संपूर्ण देशभरात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे.