
हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी, खोकला, कफ यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी लोकं रोजच्या आहाराबाबत अत्यंत जागरुक असतात. शिवाय विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांचाही आहारात समावेश करतात. आंबट फळे खाल्ल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो, असे वाटत असल्याने काही जण या दिवसांत लिंबूवर्गीय फळांचे सेवन टाळतात, मात्र काही फळे अशी आहेत की, जी आंबट असली सर्दी, खोकला झाल्यासही रोजच्या आहारात खाता येतात. त्यामुळे थंडीच्या काळातही काही आंबट फळे आवर्जून खाल्ली तरीही चालतात. पाहूया अशी कोणती फळे आहेत आणि ‘या’ फळांची माहिती.
ब्लू बेरीज
सर्दी-खोकला झाल्यावर आहारात ब्लू बेरीजचा समावेश करावा. हे फळ अँण्टिऑक्सिडंटने समृद्ध असून यामध्ये मिनरल्स, जीवनससत्त्व सी, जीवनसत्त्व के, मँगनिज आणि फायबर यासारखी पोषक तत्त्वेही भरपूर प्रमाणात असतात. यामुळे ब्लू बेरीज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी हे फळे उपयुक्त आहेत. याकरिता लिंबू, संत्र आणि द्राक्ष ही फळे थंडीच्या आजारातही खावीत.
किवी
थंडीच्या काळात होणारे नेहमीचे आजार बरे होण्यासाठी किवी हे फळ उपयुक्त आहे. यामध्ये अँण्डीऑक्सिडंट, फोलेट, पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्त्व सी, के, ई यासारखी पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात आहेत. तसेच पचनक्रिया, रक्तदाब, ब्लड क्लॉटिंग असे आजार नियंत्रणात ठेवण्याकरिता किवी फळ खाणे आवश्यक आहे. यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे सर्दी पडसे झालेले असतानासुद्धा अननस, पपई, पेरू आणि मोसंबी यासारखी फळे सेवन करता येतात.
केळं
बरेच लोक हिवाळ्यात केळं खात नाहीत, मात्र सर्दी खोकला आणि कफाचा त्रास झालेला असतानासुद्धा केळ्याचे सेवन करता येते, मात्र केळं सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी खाणे टाळावे. याबरोबरच आंबा, टरबूज, नाशपती यासारखी फळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारतही खाता येतात.




























































