
अंबाजोगाई शहरात भरदिवसा सराफा व्यापारी राहुल राठोड यांची सोन्याची दागिने डिक्कीत ठेवलेल्या स्कुटीसह अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे.
सराफा व्यापारी राहुल राठोड यांचे गुरूवार पेठेमध्ये सोन्याचांदीचे दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी शटरच्या कुलूपात फेविक्विक आणि वाळू टाकली. सोमवारी सकाळी राठोड नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले. त्यांनी स्कुटीच्या डिक्कीत सोन्याचे दागिने ठेवले होते. दुकानाचे शटर उघडत नसल्याने ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चावी बनवणाऱ्याशी बोलत होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या स्कुटीसह पोबारा केला. स्कुटीच्या डिक्कीत लाखो रूपयांचे सोन्याचे दागिने होते. या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस तपास करत आहेत.
























































