
वन्य प्राण्यांची तहान आणि माणुसकीचे उदाहारण देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ यवतमाळ जिह्यातला आहे. तहानेने व्यापुळ झालेले एक माकड थेट धावत्या एसटीसमोर आले. बस थांबल्यानंतरही ते हलत नव्हते. त्याला प्रचंड तहान लागल्याचे लक्षात येताच काही प्रवाशांनी पाण्याची बाटली पुढे केली. त्याने क्षणात बाटलीतले पाणी संपवले. मात्र गोष्ट इथे संपली नाही. काही क्षणात माकडांची टोळीच तिथे धडकली आणि पाण्यासाठी गर्दी केली. या तहानलेल्या माकडांना पाहून प्रवाशांनाही पाझर फुटला. त्यांनी स्वतःजवळच्या पाण्याच्या बाटल्या माकडांना देऊन मुक्या जनावरांची तहान भागवली. एका प्रवाशाने याचा व्हिडीओ रेका@र्ड केला. प्रवाशांनी दाखवलेल्या माणुसकीचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.



























































