जुहू चौपाटीवर तिघे बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

जुहू चौपाटीवर फिरायला आलेली चेंबूरमधील चार मुले भरतीचा अंदाज न आल्यामुळे बुडाली. मात्र, त्यापैकी एकाला वाचवण्यात लाईफगार्डला यश आले. मात्र, तिघे जण बुडाले. तिघांचा शोध अग्निशमन दल आणि नौदलाचे पथक घेत आहे, अशी माहिती अग्निशमन दल प्रमुख हेमंत परब यांनी दिली.

जुहू चौपाटीवर चेंबूरमधील चार मुले फिरायला आली होती. दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला ही मुले समुद्रात पोहायला गेली. मात्र, भरतीचा अंदाज न आल्याने ती बुडाली. यापैकी बुडणाऱया एकाला वाचवण्यात तिथे तैनात लाईफगार्ड मनोहर शेट्टी याला यश आले. अमन सिंग (21), कौस्तुभ गुप्ता ( 18), प्रथम गुप्ता (16) अशी बुडालेल्या तिघांची नावे आहेत.