मुंबई महापालिकेचे 25 वर्षांचे ऑडिट करण्यासाठी तीन सदस्यांची समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या मागील 25 वर्षांच्या कारभाराचे ऑडिट करण्याची तसेच श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा राज्य सरकारने सोमवारी मध्यरात्री विधानसभेत केली. या समितीमध्ये नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि अर्थविभाग (ऑडिट)चे संचालक यांचा समावेश आहे.भाजपचे आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना मुंबई महापालिकेतील कारभाराचे ऑडिट करण्याची मागणी केली त्यावर हे ऑडिट करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री आणि प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी केली.