
सामना ऑनलाईन । यवतमाळ
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी तीन नावांची शिफारस करण्यात आली आहे. त्यात कवी विठ्ठल वाघ, सुरेश द्वादशीवार आणि महेश एलकूंचवार यांच्या नावांचा समावेश आहे. आपल्याला निमंत्रण आले तरी आपण उद्घाटनासाठी जाणार नाही असे कवी विठ्ठल वाघ यांनी स्पष्ट केले आहे. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी साहित्य महामंडळाकडे या नावांची शिफारस केली आहे.
प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले 92 व्या यवतमाळ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले. सुरक्षेचे कारण देत संमेलनाला येऊ नका असा ई-मेल सहगल यांना आयोजकांकडून पाठवण्यात आला आहे. त्यानंतर आयोजकांनी उद्घाटनासाठी या तीन नावांची शिफारस केली आहे.

























































