कुर्ल्यात इमारतीची गॅलरी कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

मुंबईतील कुर्ला येथे एका जुन्या तीन मजली इमारतीचा काही भाग पावसामुळे कोसळला आहे. ही इमारत जुनी असल्याने याचा बराच भाग जीर्ण झाला आहे. संततधार पावसामुळे इमारतीच्या या भागातील गॅलरीचा काही भाग रविवारी कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.

कुर्ला येथील हलाव पुलजवळ ही तीन मजली इमारत आहे. दरम्यान गॅलरीचा भाग कोसळल्याचे कळताच पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आहे. आतापर्यंत इमारतीतील अनेकजणांना सुरक्षितपणे बाहेर काण्यात आले आहे.