
हिंदुस्तानच्या लष्करामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षण जवानांना दिले जाते. नगर या ठिकाणी लष्कराच्या केके रेंजमध्ये सुद्धा आज चित्त थरारक युद्धसराव पाहायला मिळाला. निमित्त होते लष्कराच्या युद्ध सराव प्रात्यक्षिकांचे. हिंदुस्तानच्या सैन्याच्या प्रमुख प्रशिक्षण संस्था असलेल्या आर्मड कॉर्प्स सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री सेंटर यांच्या वतीने मेजर जनरल अनिलराज सिंग काहलो यांच्या मार्गदर्शनाखाली हे युद्ध सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले
हिंदुस्तान मॅकेनाइज्ड सेनेच्यावतीने खारे कर्जुने येथे (केके रेंज) युद्ध सराव व प्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये सर्व प्रकारचे टॅन्क प्लॅटफॉर्म, एमबीटी अर्जुन, मोटर वाहक टॅन्क, हेलिकॉफ्टर, वायुसेना विंग, गुप्त पाहणी करणारे सैनिक या सर्वांचा समावेश होता. नगर या ठिकाणी लष्कराचे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणी जवानांना प्रशिक्षण दिले जाते. त्याकरता लष्कराचे अधिकारी यांच्या अधिपत्याखाली हे प्रशिक्षण दिले जाते. हिंदुस्थानच्या सैन्यांना प्रशिक्षणात देताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुद्धा माहिती या ठिकाणी दिली जाते लष्कराचे मुख्य केंद्र हे नगर या ठिकाणी असल्यामुळेच येथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रात्यक्षिकांत सराव हा सातत्याने केला जातो.
के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर आज नेपाळ व निमंत्रित मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर हिंदुस्थानच्या लष्कराने एक तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिके दाखविली. नगरच्या के. के. रेंजवर: लष्काराचे टेहळणी हेलीकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अत्याधुनिक रणगाडे, कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, क्षेपणास्त्रांचा मारा, गोळीबार असा युद्ध भूमीवरचा थरार के. के. रेंजवर रंगला. अतिशय मेहनत घेऊन लष्करातील जवानांनी आपल्या कार्याचे व शौर्याचे एक प्रकारे कामगिरी कशा पद्धतीने करायचे याचे धाडसी प्रात्यक्षिक दाखवल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
या युद्ध सरावात ड्रोनच्या मदतीने शत्रूवर पाळत ठेवून शत्रूला एका सेकंदात निष्प्रभ करण्यच्या लष्कराच्या क्षमतेचे प्रदर्शन दाखविण्यात आले. रणगाड्यांवरून तोफांचा मारा, बॉम्ब वर्षाव करण्यात आला. मोठ्या प्रमाणामध्ये धुरांचे लोंढेच्या लोंढे हे हवेमध्ये जाताना दिसून आले. रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडत काही क्षणात शत्रूला भस्मसात करणाऱ्या तोफांचा मारा करण्यात आला. जे अत्याधुनिक रणगाडे वापरण्यात आले. या रणगाड्यांमध्ये धूर निर्माण करण्याची अतिउच्च क्षमता आहे. त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये गन, अणु युद्धात शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या प्रात्यक्षिकांनंतर उपस्थितांना जवळून रणगाडे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे दाखविण्यात आले.
अर्जुन, भीष्म, अजय, टी-90, टी-72, बीएमपी-2 या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणाऱ्या रणगाड्यांमधून अचूक मारा करीत शत्रूचा नाश कसा करता येऊ शकतो हे दाखविण्यात आले. अर्जुन, भीष्म, अजय, टी-90, टी-72, अजय, एमबीटी अर्जुन, बीएमपी-२ या अत्याधुनिक रणगाड्यांद्वारे शत्रूचा अचूक निशाणा साधण्यात हिंदुस्थानच्या सैन्याला यश आले
के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर शनिवारी (दि. 28) नेपाळ व निमंत्रित मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर हिंदुस्थानच्या लष्कराने एक तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिके दाखविली.