
मिस आणि मिसेस दादर 2021 स्पर्धा नुकतीच पार पडली. स्पर्धेत टिया तळवलकर हिने ‘मिस दादर’चा बहुमान पटकावला. तर ‘मिसेस दादर’ रिया परळकर आणि ‘मिसेस दादर आजी’ म्हणून प्रज्ञा सबनीस विजेत्या ठरल्या. टिया ही अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांची मुलगी आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांची नात आहे.
या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे वय वर्षे 17 ते वय वर्षे 70पर्यंतच्या अनेक जणींनी यात हिरीरीने भाग घेतला. केवळ सौंदर्य किंवा शरीरयष्टी नाही तर एकूणच व्यक्तिमत्व, हुशारी, सभा चातुर्य, कलागुण आणि धडाडी या गुणांवर स्पर्धेचे मूल्यांकन करण्यात आले. डॉ. संदेश मयेकर, अर्चना नेवरेकर, संजय मोने, भारत अॅड डोरीस, मेघना जाधव, यश सरदेसाई, अभिजीत पानसे इत्यादी विविध क्षेत्रांतील मान्यवर परीक्षक म्हणून उपस्थित होते. अशा स्पर्धेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील महिलांचे मनोबल वाढवण्यास आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत होते, असे आयोजिका मनाली कामत यांनी सांगितले.




























































