भेसळ कशी ओळखाल

मसाल्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये नफ्यासाठी भेसळ केली जाते. या भेसळीमुळे आपल्याला वेगवेगळे विकार जडतात. पण वेळीच ही भेसळ ओळखली तर त्याचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात.

  • लाल तिखट म्हणजेच मिरची पावडरमध्ये कृत्रिम रंग किंवा विटेचा भुसा घालून भेसळ केली जाते. ही भेसळ ओळखायची तर चमचाभर तिखट ग्लासभर पाण्यात टाका. चमच्याने हे मिश्रण ढवळा. लाल रंगाची बारीक लेयर तयार झाली तर त्यात कृत्रिम रंग घातला असल्याचे स्पष्ट होते. याच मिश्रणात जर ग्लासच्या तळाला हीच लेयर जमा झाली तर त्यात विटेचे तुकडे घातले असल्याचे समजावे.
  • हळदीमध्ये कृत्रिम पिकळा रंग, लीड क्रोमॅट किंवा खडूची पावडर घातली तरी ते कळतही नाही. पण शुद्ध हळद ओळखायची असेल तर हळद एका पारदर्शक ग्लासमध्ये घ्या आणि पाण्याचे व एचसीएल ऑसिडचे काही थेंब ड्रॉप्स त्यात घाला. रंग गुलाबी रंग झाला तर कृत्रिम पिवळा रंग आहे हे स्पष्ट होते.
  • जिऱ्यात गवताच्या बिया, कोळसा, लाकडाचा भुसा, स्टार्च घालतात. ती ओळखायची तर चमचाभर जिरे ग्लासभर पाण्यात मिसळा. भेसळ केलेले पदार्थ तरंगताना दिसतील आणि शुद्ध पदार्थ तळाला जाऊन बसतील. जिऱ्यात कोळसा घातला जातो. ते ओळखण्यासाठी जिरे फक्त दोन्ही हातांनी रगडा. हात काळे झाले तर त्यात भेसळ आहे.
  • कोथिंबीर पावडरीत भेसळ आहे का ते ओळखण्यासाठी ती चमचाभर घेऊन पाण्यात टाका. या पावडरीत हस्क असेल तर पावडर तरंगताना दिसेल. शुद्ध पावडर खाली तळाला बसेल.
  • काळी मिरीमध्ये पपईच्या बिया घालून बेमालूम भेसळ केली जाते. त्यामुळे काही काळ्या मिरीचे दाणे दारूच्या बाटलीत टाकून बघा, पपईच्या बिया बुडतात, पण खरी काळी मिरी तरंगताना दिसेल.
  • मोहरीमध्ये अर्जेमोन बिया घालून भेसळ केली जाते. अशावेळी मोहरी बारीक कुटून घ्या. जर कठीण बाह्य भाग आणि पांढरी पाकडर असेल तर त्यात अर्जेमोन बिया आहेत, पण जर मऊ बाह्य भाग आहे आणि पिवळा आतला भाग आहे तर ती खरी मोहरी आहे.
  • साखरेत खडूची पावडर मिसळली जाऊ शकते. अशावेळी चमचाभर साखर पाण्यात मिसळा. ती विरघळली तर साखरच आहे, पण न विरघळताच पाण्याचा रंग पांढरा झाला तर त्यात खडूची पावडर आहे असे समजावे.
  • मिठातही खडूची पावडर मिसळतात. अशावेळी चमचाभर मीठ पाण्यात टाका जे विरघळले तर ते मीठ, पण पाण्याचा रंग पांढरा झाला व पावडर तळाला जाऊन बसली तर मात्र त्यात खडूची पावडर आहे.