Tokyo Olympic – पी. व्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, मेडलपासून फक्त एक पाऊल दूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची शटलक्वीन पी.व्ही सिंधूने पी. व्ही सिंधूचा उपांत्य फेरीत जपानच्या यामागुचीला हरवत पी. व्ही सिंधूचा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सिंधू ही आता ऑलिम्पिक पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. सिंधूने यामागुचीला 21-13, 22-20 अशा सरळ सेटमध्ये हरवले.

सिंधू व यामागुचीमध्ये सामना सुरू झाला तेव्हा ही टक्कर जबरदस्त होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पहिल्या सेटमध्ये सिंधूचेच वर्चस्व राहिले. सिंधूने पहिला सेट 21-13 च्या फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र दोघींनीही एकमेकींना काँटे की टक्कर दिली. मात्र अखेरीस दोन गुण जास्त मिळवत सिंधूने हा सामना आपल्या नावावर केला.