ऑलिम्पिकसाठी नवीन काैशल्य आत्मसात करतेय, हिंदुस्थानची शटलक्वीन पी.व्ही. सिंधूचे उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंवर वर्चस्व गाजविण्यासाठी मी सध्या नवीन तंत्र आणि काैशल्य आत्मसात करीत आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले हेते. कोरोना महामारीमुळे बहुतांश स्पर्धा बंद असल्यामुळे भरपूर विश्रांती करता आली. खेळात नवीन प्रयोग करायला संधी मिळाली. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोनेरी यशासाठी मी सर्वस्व पणाला लावीन, असा निर्धार हिंदुस्थानची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने व्यक्त केला.

हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरणाकडून (साई) आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत पी.व्ही. सिंधू बोलत होती. ती म्हणाली, लागोपाठच्या स्पर्धांमुळे आधी आम्हाला खेळात सुधारणा करायला पिंवा नवीन काैशल्य आत्मसाथ करायला वेळ मिळत नव्हता. आता कोरोनामुळे तो मिळाल्याने खेळातील वेगळ्या गोष्टी शिकण्यावर सध्या मी भर देतेय. कोर्टवर आक्रमक होऊन खेळायला मला आवडते. प्रतिस्पर्धी खेळाडूही माझा खेळ जाणतात. त्यामुळे आता बचावात्मक खेळावर मी अधिक सराव करतेय. उंची जास्त असल्याने मी आक्रमणावर अधिक भर देते. मात्र आता आक्रमणाबरोबरच बचावही भक्कम झाल्यास त्याचा मला नक्कीच अधिक फायदा होणार आहे.

पॅरोलिनाच्या माघारीने चुरस कमी होत नाही

स्पेनच्या पॅरोलिना मरीनने गुडघ्याच्या दुखापतीमुळे टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. मागील रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये याच पॅरोलिनाकडून पराभूत झाल्याने सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. पॅरोलिनाच्या माघारीवर सावध प्रतिक्रिया देताना पी.व्ही. सिंधू म्हणाली, तिच्या माघारीने स्पर्धेतील चुरस अजिबात कमी होणार नाही. कारण महिला बॅडमिंटनमध्ये अक्वल दहा खेळाडू या सारख्याच ताकदीच्या असतात. यातील एक खेळाडू नसेल तर चुरस कमी होत नाही. ताई जू यिंग, रतचानोक इंतानोन, नोजोमी ओकुहारा व अकेनी यामागुची या सर्व तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे सर्वोत्तम खेळ दाखविल्याशिवाय तुम्हाला विजय मिळू शकत नाही, असेही सिंधूने सांगितले.

चिनी खेळाडूंपासून सावधान

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चिनी खेळाडूंपासून सावध राहावे लागणार आहे. कारण प्रदीर्घ काळापासून त्या स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळत नाहीयेत. त्यामुळे त्यांचा खेळ बघायला मिळालेला नाही. चेन यू फेई व ही बिंग जियाओ या चीनच्या प्रतिभावान खेळाडू आहेत. ऑलिम्पिकमध्ये संपूर्ण वातावरण वेगळे असते. त्यामुळे कुठल्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची चूक महागात पडू शकते, असेही पी.व्ही. सिंधूने सांगितले.