
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणारी हिंदुस्थानची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर मोहोर उमटवली आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱ्या चीनच्या बी बिंग जियो हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. यासह सलग ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणारी ती हिंदुस्थानची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
रविवारी सायंकाळी हिंदुस्थानची पी.व्ही. सिंधू आणि चीनची बी बिंग जियो यांच्यात कांस्यपदकासाठी सामना रंगला. सिंधूने दमदार सुरुवात केली असून पहिला सेट 21-13 असा आपल्या नावावर केला आहे. दुसऱ्या सेटमध्ये दोघींमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र सिंधूने बाजी मारत हा सेट 21-15 असा जिंकत सामनाही आपल्या नावे केला.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Badminton
Women’s Singles Bronze Medal MatchYou did it @Pvsindhu1
Back to back Olympic medals for PV Sindhu! Defeats Bing Jiao to be the 2nd Indian athlete to win 2 individual #Olympics medals. #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/YfXDvPTpzg— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2021
सुवर्णस्वप्न भंगले!
तत्पूर्वी पी. व्ही. सिंधू हिला टोकियो ऑलिम्पिकमधील बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते. तेई झू यिंग हिच्याकडून पी. व्ही. सिंधूला 21-18 आणि 21-12 अशी हार सहन करावी लागली. यामुळे तिच्या महिला गटात सुवर्ण पदक जिंकण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले.
हिंदुस्थानचे तिसरे पदक
दरम्यान, यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमधील हे हिंदुस्थानचे तिसरे मेडल आहे. याआधी मीराबाई चानू हिने वेट लिफ्टिंगचं सिल्व्हर मेडल जिंकले होते, तर महिला बॉक्सर लवलीनाने किमान कांस्यपदक पक्के केले आहे.



























































