
देशातील सर्व टोलनाके एका वर्षात हटविले जातील आणि जीपीएसवर आधारित टोलवसुली प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत केली. दरम्यान, या निर्णयामुळे टोलनाक्यांवर लागणाऱया लांबच लांब रांगांमुळे नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाचीही बचत होणार आहे
16 फेब्रुवारीपासून देशात फास्टटॅगचा वापराची सक्ती केली आहे. आतापर्यंत 93 टक्के वाहनांवर फास्टटॅग लावले आहेत. मात्र, 7 टक्के वाहनांवर ही इलेक्ट्रॉनिक पेमेंट चलन प्रणाली लावलेली नाही. दुप्पट दंड टोलवसुली फास्टटॅग नसणाऱयांकडून घेतली जात आहे.
फास्टटॅगच्या माध्यमातून टोल न भरणाऱया वाहनांची पोलीस चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. फास्टटॅग नसल्यास टोल आणि जीएसटी चोरीची केस दाखल करण्यात येईल असे गडकरी यांनी सांगितले.



























































