
पत्नीपासून परदेश दौऱयाची माहिती लपवण्यासाठी पासपोर्टची पाने फाडल्याचा प्रकार ताजा असतानाच पत्नीशी भांडण झाल्याने रागाच्या भरात मुलगा, पत्नी आणि स्वतःच्या पासपोर्टची पाने फाडल्याची घटना समोर आली आहे. पुढील प्रवास करण्यासाठी स्वतःच्या पासपोर्टवर मुलाच्या पासपोर्टचे कव्हर पेज लावून प्रवास करणाऱयाला सहार पोलिसांनी अटक केली. दिलबाग सिंग असे त्याचे नाव आहे.
मूळचा पंजाबचा रहिवासी असलेला दिलबाग सिंगला भ्रमंती करायची आवड आहे. लग्न झाल्यावर तो हिंदुस्थानबाहेर फिरायला गेला नव्हता. मार्च महिन्यात दिलबाग पत्नी आणि अकरा वर्षांच्या मुलाला घेऊन दुबईला फिरायला गेला. त्याचदरम्यान दिलबागचे पत्नीसोबत भांडण झाले. रागाच्या भरात त्याने तिघांच्या पासपोर्टचे कव्हर पेज फाडले. त्यानंतर राग शांत झाल्यावर दिलबागने स्थानिकांच्या मदतीने ते तिन्ही पासपोर्ट तात्पुरत्या स्वरूपात शिवले. त्याने मुलाच्या पासपोर्टचे कव्हर पेज स्वतःच्या पासपोर्टला तर स्वतःचे कव्हर मुलाच्या पासपोर्टवर लावले. पासपोर्ट प्रकरणात दिलबागने याची माहिती दूतावासाला देणे आवश्यक होती, मात्र त्याने माहिती न देता दुबई, थायलंड, जपान, मेक्सिको आणि सिल्वाडोअर येथे प्रवास केला.
गेल्या आठवडय़ात दिलबाग हा मेक्सिको येथे आला. त्याच्या पासपोर्टची तपासणी केली असता विमानतळ अधिकाऱयांना संशय आला. विमानतळ अधिकाऱयाने त्याला पुन्हा मुंबईत पाठवले. याची माहिती विमानतळ अधिकाऱयांना दिली. चौकशीसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले.न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.


























































