जालन्यात नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई; 31 गुन्हे दाखल, 7 हजारांचा दंड वसूल

जालना शहरात शनिवारी सकाळी सुभाष चौकात वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या पथकाने नाकाबंदी करत नियम मोडणाऱ्या मोटार सायकलस्वारांवर कारवाई केली. यावेळी 31 गुन्हे दाखल करून 7 हजारांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती सुरेश भाले यांनी दिली.

ट्रिपल सीट बसवून वाहन चालविणे, वाहनाचा नंबर अस्पष्ट असणे, कागदपत्रे जवळ नसणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालवणे अशाप्रकारे वाहतूक नियम मोडणाऱ्या मोटार सायकल स्वारांवर कारवाई करण्यात आली. दंड न भरणाऱ्यांच्या मोटार सायकल वाहतुक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सुरू ठेवणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांनी सांगितले. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विनायक देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या