
इजिप्तमधील सुएझ कालव्यात आठवड्याभरापासून अडकलेले महाकाय मालवाहू जहाज हटवण्यात सोमवारी यश आले आहे. त्यामुळे सुएझ कालव्यात झालेली वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. याबाबतची माहिती इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आठवड्याभरापासून सुएझ कालव्यात अडकलेले माहवाहू जहाज हटवण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कालव्यात अडकेलेल्या या महाकाय मालवाहू जहाजाचे नाव ‘एवर गिवेन’ आहे. हे जहाज 400 मीटर लांब आणि 59 मीटर रुंद आहे. हे जहाज चीनहून नेदरलँडच्या रोटेरडमकडे जात होते. त्यावेळी कालव्यात हे जहाज अडकले होते.
हे जहाज हटवण्यासाठी आठवड्याभरापासून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, त्याच्या एकारमानामुळे त्यात यश येत नव्हते. हे जहाज अडकल्याने सुएझ कालव्यात मोठ्या प्रमणात जहाजे अडकली होती. तसेच कालव्यातील वाहतूक ठप्प झाली होती. आठवड्याभराच्या प्रयत्नानंतर हे जहाज हटवण्यात यश आल्याने आता कालव्यातील वाहतूक कोंडी सुटणार आहे.

























































