
दरवर्षी मे महिना आला की, जिल्हा परिषद कर्मचाऱयांना बदल्यांचे वेध लागतात. यंदादेखील मे महिन्यात झेडपी कर्मचाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, यासाठी 8 ते 12 मे या दरम्यान प्रक्रिया होणार होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवार दि. 9 ते 12 मे असा बदल्यांचा कालावधी निश्चित केला आहे. त्यानुसार कर्मचाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया या दरम्यान पार पडणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांचे विभागनिहाय वेळापत्रक तयार केले असून, पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन, शिक्षण आणि कृषी विभागातील कर्मचाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक वगळता सुमारे 3 हजारांच्या जवळपास कर्मचारी आहेत. दरवर्षी ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार यातील बदलीपात्र कर्मचाऱयांची 10 टक्के प्रशासकीय आणि 10 टक्के विनंती बदल्या करण्यात येतात. कर्मचाऱयांच्या बदल्यांचा विषय अतिशय संवेदनशील असल्याने प्रशासन सावधपूर्वक बदल्यांचा विषय हाताळत असतात. बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने 18 एप्रिल रोजी बदली पात्र कर्मचाऱयांची प्रारूप ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 25 एप्रिलला सायंकाळी पाच वाजेपर्यंत बदली ठिकाणाचे विकल्प कर्मचाऱयांकडून घेण्यात होते. शुक्रवारी (दि. 28) कर्मचाऱयांनी दिलेल्या बदलीच्या ठिकाणांचे विकल्प, संबंधितांचा विनंती अर्ज कागदपत्रांसह त्या-त्या विभागाच्या प्रमुखांनी एकत्र करून सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केले होते. त्यानंतर 2 मे रोजी प्रारूप बदलीपात्र कर्मचाऱयांच्या यादीवरील आक्षेप आणि हरकतींवर सुनावणी घेऊन संवर्गनिहाय कर्मचाऱयांची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली. आता या यादीनुसार विभागनिहाय कर्मचाऱयांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी 9 ते 12 मे ही तारीख निश्चित करून बदलीसाठीचे विभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले आहेत.
या वेळापत्रकानुसार पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन आणि कृषी विभागासह जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा असणाऱया प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱयांच्या बदल्या होणार आहेत. त्यानंतर बुधवारी (दि. 10) अर्थ विभाग, ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱयांच्या, गुरुवारी (दि. 11) महिला बालकल्याण आणि पशुसंवर्धन विभाग, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि बांधकाम विभागासह शुक्रवारी (दि. 12) आरोग्य विभागातील कर्मचाऱयांच्या बदल्या होणार आहेत.
16 ते 25 मेदरम्यान तालुका पातळीवरील बदल्या होणार
जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 2014 ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार पंचायत समिती पातळीवर तालुकाअंतर्गत बदलीपात्र कर्मचाऱयांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी 16 ते 25 मे हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पंचायत समिती पातळीवर होणाऱया बदल्यांची संपूर्ण जवाबदारी ही गटविकास अधिकारी यांच्यावर असते. त्या ठिकाणीदेखील 10 विनंती आणि 10 टक्के प्रशासकीय बदल्या होतात.

























































