नोटाबंदीची चौकशी करू; तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

नोटाबंदीमुळे देश रसातळाला गेला. देशाची आर्थिक स्थिती बिघडली. त्यामुळे नोटाबंदीची संपूर्ण चौकशी करू तसेच निती आयोग रद्द करून पुन्हा नियोजन आयोगाची स्थापना करू, अशी आश्वासने तृणमूल काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या हस्ते लोकसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

यावेळी तृणमूलचे नेतेही उपस्थित होते. सत्तेत आलो तर काही महत्त्वाचे बदल केले जातील, असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. जीएसटीमुळे लोकांना खरेच फायदा होत असेल तर तो ठेवू, नाही तर त्यात सुधारणा करू, असे आश्वासन तृणमूल ममता यांनी दिले. रोजगार हमी योजनेचे दिवस वाढवून ते 200 करू. त्यामुळे लोकांना अधिक फायदा होईल, असेही त्या म्हणाल्या.