
पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करुन तिला तिहेरी तलाक देणाऱ्य़ा पतीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कोंढव्यातील भाग्योदयनगरमध्ये घडली.
रेहान इलियास शेख (वय 31) आणि फरिदा इलियास शेख या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आल आहे. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि रेहान यांचे 2015 मध्ये लग्न झाले होते . लग्नानंतर रेहानने पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ केला. तिला मारहाण करुन दुसरे लग्न करण्याची धमकी दिली.
मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षणविरूद्ध रेहानने पत्नीला तोंडी तलाक दिला. तर सासू फरिदाने फिर्यादी महिलेला मारहाण करुन पैशांची मागणी करीत शारिरीक व मानसिक त्रास दिला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट तपास करीत आहेत.


























































