मनवा आणि राजवीर अडकणार लग्नबेडीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

झी युवा वाहिनीने नुकताच ‘तू अशी जवळी राहा’ हा एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या मालिकेतील राजवीर आणि मनवा लककरच लग्नबेडीत अडकणार आहेत. रविवार 9 डिसेंबर संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणार्‍या 1 तासाच्या विशेष भागात हा लग्न सोहळा दाखविला जाणार आहे. मनवाचे वडील मनवाचं कन्यादान करण्यासाठी नकार देतात कारण त्यांच्या मते मुलगी ही कुठली वस्तू नाही आहे जी कोणी दान करावी. जरी राजवीरशी मनवाचं लग्न झालं तरीही मनवा ही शेवट पर्यंत त्यांची मुलगीच  राहणार आहे.