
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असणाऱ्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी 9 दिवसाची मंचकी निद्रा संपून श्री तुळजाभवानी मातेची सिंहासनावर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव 6 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. 15 ऑक्टोबर रोजी पहाटे श्री देवीची सिंहासनावरती प्रतिष्ठापना करून दुपारी 12 वाजता घटस्थापना करण्यात आली. 16 ते 22 आक्टोबरदरम्यान रोजी देवीची विशेष अलंकार पूजा असेल. 18 ऑक्टोबर रोजी रथ अलंकार, 19 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार, 20 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार, 21 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार, तर 22 ऑक्टोबरला महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा होईल.
दररोज देवीचा छबीना धार्मिक विधी पार पडला जाणार आहे. 23 ऑक्टोबरला दुपारी होमकुंडावरती धार्मिक विधी व घटोउद्यापन केला जाईल. 24 ऑक्टोबरला पहाटे श्री देवीचे सिम्मोलंघन व मंचकी (श्रम) निद्रा भोपे पुजा-यांकडून दिली जाणार आहे. 28 ऑक्टोबरला कोजागिरी पोर्णिमा असून 29 ऑक्टोबरला पहाटे देवीची सिंहासनावरती पुन्हा प्रतिष्ठापना करून रात्री छबीना व जोगवा धार्मिक विधी पार पाडला जाणार आहे. 29 व 30 आक्टोबर रोजी सोलापूरच्या मानाच्या काठ्यांचे आगमन व छबीनासह शारदीय नवरात्रची सांगता होणार आहे. या महोत्सवा दरम्यान देशातील कानाकोपऱ्यातील भावी भवानी मातेच्या दर्शनाला येतात.
करवीर नगरीत शारदीय नवरात्रौत्सवास घटस्थापनेने प्रारंभ
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या करवीर नगरीत शारदीय नवरात्रोत्सवाच्या चैतन्यदायी व मंगलमय पर्वास आज सकाळी घटस्थापनेने प्रारंभ झाला. मंदिरात सकाळी साडेआठच्या सुमारास मानाच्या तोफेच्या सलामीनंतर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई, ऐतिहासिक जुना राजवाडा येथील श्रीतुळजाभवानी, दख्खनचा राजा श्रीजोतिबा तसेच नवदुर्गा मंदिरामध्ये पारंपारिक व विधिवत मंत्रोंपचारात घटस्थापना करण्यात आली. शिवाय घरोघरी ही पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. दरम्यान आज पहाटे पासुनच श्रीअंबाबाई मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी अभुतपूर्व गर्दी केली आहे.
View this post on Instagram

























































