तुर्की, ग्रीस भीषण भूकंपाने हादरले, इमारती धडाधड कोसळल्या; 31 ठार 135 जखमी

तुर्की आणि ग्रीस ही दोन शहरे आज भीषण भूकंपाने हादरली. तुर्कीमधील अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. अवघे शहरच उद्ध्वस्त झाले.

turkey-earthquake

या शक्तिशाली भूपंपात 31 जण ठार तर 135 जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हा भूकंप सात रिश्टर स्केल क्षमतेचा होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू एजियन समुद्रात साडेसोळा किलोमीटर खाली होता.

turkey-after-earthquake

सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 6.9 रिश्टर स्केल होती आणि त्याचा केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्येला असणाऱया सामोस बेटावर होता अशी माहिती युरोपियन-भूमध्यसागर भूकंपशास्त्र्ा केंद्राकडून देण्यात आली.

turkey-building-collapsed

तुर्कीचे या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले. तेथील इजमिर शहरातील बहुमजली इमारती कोसळल्या. सुरूवातीच्या वृत्तानुसार त्यात 4 जण ठार तर 150 हून जास्त जखमी झाले होते. जखमी व मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भूकंपग्रस्त भागात मदत व बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. तुर्कीच्या बोर्नोवा आणि बेराकली शह या भागातही इमारती कोसळून नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. ग्रीसमध्ये भूकंपाचे धक्के जाणवताच सुरक्षेसाठी नागरिक घराबाहेर पडून मोकळ्या मैदानात आले.

आपली प्रतिक्रिया द्या