ट्विटरवर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात मुंबईकर आघाडीवर!

253
twitter

कोरोनामुळे 2020 हे वर्ष अनेकांच्या आयुष्यात चढ उतारांचे राहिले आहे. कोरोनाच्या महामारीपूर्वी ट्विटरवर कोणत्या विषयावर सर्वाधिक चर्चा केली गेली याचा आढावा घेणारा कन्वर्सेशन रिप्ले हा अहवाल नुकताच ट्विटरने सादर केला आहे. जुन्या आठवणींबद्दल ट्विटरवर चर्चा करण्यात मुंबईकर आघाडीवर असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. या काळात मुंबईकरांनी जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटो, बालपणीचे फोटो सर्वाधिक शेयर केल्याचे पाहायला मिळाले.

या अभ्यासासाठी ट्विटर इंडियाने 22 शहरांमधील सप्टेंबर-नोव्हेंबर 2019 या महिन्यातील 8,50,000 ट्विटसचा अभ्यास केला होता. त्यानुसार, 2019 मध्ये एनिमल्स, सेलिब्रेशन, सेलिब्रिटी कन्टेन्ट, डुइंग गुड डीड्स, फॅमिली, फूड, ह्यूमर, नॉस्टेल्जिया, रोमान्स व स्पोर्टस् अशा विविध विषयांवर ट्विटरवर सर्वाधिक चर्चा केल्याचे पाहायला मिळाले.  एर्नाकुलम, हैद्राबाद व चेनई यासारखी शहरे स्पोर्टस्, फूड, सेलिब्रेशन, सेलिब्रिटी कन्टेन्ट व ह्यूमर या थीम्समधील संवादांमध्ये अव्वल स्थानी राहिले. लुधियाना रोमान्समधील संवादांमध्ये, तर रायपूर प्राण्यांबद्दलच्या संवादांमध्ये अव्वल स्थानी राहिले. भुवनेश्वरमध्ये नागरिकांनी फॅमिली व डुइंग गुड डीड्स या थीम्समधील संवादाला पसंती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या