ग्राहकांकडून मिळालेली त्यांची महत्त्वाची माहिती इतर ऍप्सना पुरविण्याचे धंदे करणार्‍या ट्विटर आणि फेसबुक या ऍप्सवरच पुन्हा एकदा ग्राहकांचा खासगी डेटा लीक झाल्याचे उघड झाले आहे. ही डेटा चोरी गुगल प्ले स्टोअरवरील थर्ड पार्टी ऍप्स करत असल्याचेही समोर आले आहे. ज्या ग्राहकांनी ही थर्ड पार्टी ऍप्सना लॉगइन केले आहे त्यांचाच डेटा चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर आता ट्वीटर आणि फेसबुकला जाग आली असून या डेटा चोरीबाबत ते त्या त्या ग्राहकाला मेसेजद्वारे सूचित करायला लागले आहेत.

‘वन ऑडियन्स’ आणि ‘मोबीबर्न’ हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट मोबाईल वापरणार्‍या ग्राहकांचा खासगी डेटा इतरांना पुरवीत असल्याचे सुरक्षा संशोधकांनी सांगितले. यात ग्राहकांचा ईमेल आयडी, युजरनेम आणि त्यांचे लेटेस्ट ट्वीटस इतर ऍप्सना पुरविले जात होते. ट्विटरने याबाबत म्हटले की, सोमवारीच आम्हाला वन ऑडियन्सद्वारे संचालित केल्या जाणार्‍या किटबाबत माहिती मिळाली. ट्विटर अकाऊंटवर ग्राहकाची प्रायव्हसी आम्हाला जास्त महत्त्वाची आहे. मात्र आमच्याकडूनच हा डेटा त्या दुसर्‍या ऍप्सना नजरचुकीने गेला. दुसरीकडे फेसबुकनेही प्ले स्टोअरवरील काही थर्ड पार्टी ऍप्स ग्राहकांचा खासगी डेटा मागत असल्याचे कबूल केले. फेसबुकने आता या ऍप्सना डेटा देण्याचे बंद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या