भांडूपमध्ये भीषण अपघात, २ ठार ३ जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पूर्व द्रुतगती मार्गावर भांडूप येथे आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकूण ५ जण जखमी झाले होते, ज्यातील २ जणांना रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आहे. उर्वरीत तिघांवर मुलुंडमधील फोर्टीस हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळी साडेसहाच्या सुमारास MH04 HU 0072 या नंबरच्या होंडा सिटीने कंटनेरला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. सकाळच्या वेळी रस्त्यावर वाहतूक तुरळक असते, यामुळे कारचालकाचा वेग जास्त असावा असा अंदाज आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने ठाण्याच्या दिशेने जात असलेली ही कार मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घुसली. मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरवर ती आदळल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे.