मरिन ड्राईव्हवर दोन जण बुडाले, शोधकार्य सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
drowned

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील मरिन ड्राईव्हवर उसळलेल्या लाटांचा आनंद घेण्यासाठी गेलेले दोन जण बुडाल्याचे समोर आले आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. बचाव पथक त्यांचा शोध घेत अद्याप त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही. बुडालेल्यांमध्ये एक आठ वर्षांचा मुलगा असून तो बुडत असताना त्याला वाचवायला गेलेला एक तरुण देखील बुडाल्याचे समजते.